आठवण…

आज पुन्हा तुझी आठवण आली

आज पुन्हा डोळ्याची कड ओली झाली

तू नाही समजू शकलीस मला

या हृदयातली तुझी जागा तू गमावली ।

सोबत असताना 

माझी किंमत तुला समजली नाही

मी दूर झाल्यावर 

तुला जगण्याची दिशा मिळाली नाही ।•आनंद …

तू…

नकळत भेटलीस अजाण वाटेवर

दवबिंदु जणू हिरव्या पानावर

दैवी क्षण होते ते खास

कदाचित एकमेकांचाच होता ध्यास..


माझ्या स्वप्नातली राणी

माझ्या मनातली गाणी

जगावेगळी आपली कहाणी

या जगण्याची तू अर्धांगिणी..


कधी तुझं अलिप्त राहणं

मग पुन्हा माझ्यासाठी झुरणं

अबोल राहून खुप काही बोलून जाणं

तुझ्या निरागस डोळ्यातलं सांगणं

तुझे अश्रु अन त्यातून माझं ओघळण..


नकळत मला दुखावणं

मग मी दूर होताच तुझ ते घाबरणं

हवेत दरवळवारा हा सुगंध

तुझ्या आठवणीने मन माझे होते बेधुंद…

  • आनंद…